रत्नागिरी : हातखंबा येथे वीज पोलवर वायरमन भाजून जखमी

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथे वीज खांबावर काम करीत असलेला वायरमन रिव्हर्स करंट आल्यामुळे भाजल्याची घटना तालुक्यातील हातखंबा येथे घडली. सहकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी तात्काळ या कर्मचाऱ्याला खांबावरुन खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले.

banner 728x90


हातखंबा हायस्कूलनजीक वीज खांबावरती काम सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी वीज वाहिनीवरील विद्युतप्रवाह बंद करण्यात आलेला हातो. त्यानंतर हा कर्मचारी वीज खांबावरती दुरुस्तीचे काम करीत होता. अचानक रिव्हर्स करंट आल्याने तो चिकटला. त्याचवेळी सोबतीला असणाऱ्या कर्मचाऱ्याने खांबावरती पुन्हा शटडाऊन करीत वीज प्रवाह बंद असल्याची खात्री केली.

त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यासह ग्रामस्थांनी शिड्या आणून या वायरमनला खाली उतरवले. त्याच्या दोन्ही पायांना व हाताला जखमा झाल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून या कर्मचाऱ्याचा जीव वाचला.

त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हातखंबा येथील सामाजिक कार्यकर्ते निरंजन जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच धावपळ करण्यात पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *