रत्नागिरी : हातखंबा नाक्यावर 35 लाखांचे सोने पकडले, ‘एसएसटी’ पथकाची कारवा

banner 468x60

मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता 34 लाख 85 हजार 947 रुपयांचे सोने विना पावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली

banner 728x90

इको हे वाहन मंगळवारी मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या एसएसटी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात 34 लाख 85 हजार 947 रुपयांचे सोने आढळले.

याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एसएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार पाचही विधानसभा मतदार संघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *