रत्नागिरी : गणेशोत्सवात 7, 12 आणि 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद

banner 468x60

गणेशोत्सव काळात दारु पिऊन धिंगाणा होऊ नये, किंवा दारु हे कुठल्याही अनुचित प्रकाराचे कारण ठरु नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दारुबंदीचे आदेशच काढले आहेत.

त्यानुसार, गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी म्हणजे शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी रत्नागिरी जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी (Collector) एम.देवेंदर सिंह यांनी सणासुदीच्या, गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात तीन दिवस मद्यविक्रीला (Liquor) बंदी घातली आहे.

त्यानुसार, शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी सिंह यांनी शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या

तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत.


निर्णयाचे स्वागत, अन्यथा कारवाई
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे, गणेश मिरवणुकीत मद्यपींचा दारु पिऊन होणारा डान्स टळणार आहे. तर, जिल्ह्यात कुठेही दारुची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव सणाची सर्वांनाच उत्सुकता असते, हिंदू धर्मात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण साजरा करतात.

मात्र, या उत्सवातील मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडल्यास सणाला गालबोट लागते. त्यामुळे, जिल्हाधिकारी सिंह यांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्हाभरातील गणेशभक्तांकडून स्वागत केलं जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *