रत्नागिरी : शुल्क वाढी विरोधात परमिट रूम, हॉटेल, बार संघटनेचा आज बंद

banner 468x60

राज्य शासनाच्या दारूविक्रीवरील करवाढ धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील बार मालक आणि परमिट वाईन शॉप विक्रेते उतरणार आहेत.

banner 728x90

मद्यावरील व्हॅटमध्ये वाढ, परवाना शुल्कात १५ टक्के, तर उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई, तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने सोमवारी कडकडीत बंद पुकारण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज यांनी दिली.


या बंदल जिल्ह्यातील परमिट रूम, बार, हॉटेल असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवारी सकाळी ११ ते ५ दरम्यान व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी बार चालक व वाईन शॉप विक्रेते जिल्हा प्रशासनाला आपले निवेदन सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *