रत्नागिरी : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीवरील दोघेजण ठार

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या टीआरपी येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

मुक्तेश्वर ठीक (59, रा. विमानतळ प्रशांत नगर, रत्नागिरी), राघू धुरी (69, साईनगर, रत्नागिरी) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही महावितरणचे कर्मचारी होते. त्यातील राघ धरी हे निवत्त आहेत. कुवारबाव कडून ९ रत्नागिरीच्या दिशेने डंपर चालक येत होता.

याचवेळी मारुती मंदिर वरून कुवरबावच्या दिशेने दुचाकीस्वार चालले होते. टीआरपी साई एजन्सी स्टॉप जवळ दुचाकी आली असता दुचाकी घसरून डंपरच्या खाली गेल्याने डंपरचे चाक मुक्तेश्वर ठीक, राघू धुरी यांच्या डोक्यावरून गेले.

यातच दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघानाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या नातेवाइकांना याची खबर देण्यात आली आहे.

नातेवाईक सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *