विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे राज्यातील रत्नागिरीसह प्रमुख ४५ शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती.आता मात्र सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.
केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत देखील कारवाई केली जात आहे.५०० रु. दंड, 3 महिने परवाना निलंबन मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवत असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे.
विनाहेल्मेट मोटारसायकल चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या शहरांमध्ये लागू होणार हेल्मट सक्तीचे आदेश मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, पुणे शहर व ग्रामीण, नागपूर शहर, सोलापूर शहर व ग्रामीण, अमरावती, पिंपरी- चिंचवड, मीरा भाईंदर, वसई-विरार, अकोला, अमरावती शहर व ग्रामीण, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे शहर व ग्रामीण, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*