रत्नागिरी : दुचाकीस्वार युवकावर बिबट्याचा हल्ला

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे दुचाकीवर मागे बसलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवार 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा.सुमारास घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (15,रा.गावडे आंबेरे, रत्नागिरी) जखमी युवकाचे नाव आहे.

banner 728x90

शुक्रवारी सकाळी तेजोमय हा त्याचा चुलत भाउ प्रथमेच्या याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून पूर्णगड ते गावडे आंबेरे असा मासे विकून सकाळी 6.30 वा.सुमारास घरी जात होता. त्यांची दुचाकी गावडे आंबेरे – बिर्जेवाडी येथील चढावात आली असता अचानकपणे जंगलातून एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तेजोमयच्या डाव्या पायावर पंजाने हल्ला करुन त्याला जखमी केले.

बिबट्याने अचानकपणे हल्ला केल्याने दोघेही दुचाकीवरुन खाली पडल्याने बिबट्याने पुन्हा जंगलात धाव घेतली. दरम्यान, जखमी तेजोमयला उपचारांसाठी प्रथम जाकादेवी येथील खासगी डॉक्टरांकडे नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार केल्यानंतर तेजोमय डोर्लेकरच्या नातेवाईकांनी रत्नागिरी येथील वनविभागात जाउन बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असून गावडे आंबेरे येथील नागरिकांना बिबट्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेजोमयवर अधिक उपचारांची गरज असल्यास त्याला सर्व ती मदत वनविभागाकडून करण्यात येईल अशी ग्वाही रत्नागिरी वनविभागाकडून तेजोमयच्या नातेवाईकांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *