रत्नागिरी : जंगलात पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘विराट’ने शोधले

banner 468x60

वडील रागावले म्हणून घर सोडून घनदाट जंगलामध्ये पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला शोधण्यात यश आले आहे.

श्वान पथकातील ‘विराट’मुळे मुलीचा थांगपत्ता लागला असून योग्य समुपदेशन केल्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या दुचाकीवरून शाळेत येत-जात असल्याने वडील मुलीवर रागावले होते. यामुळे घाबरलेली मुलगी पेढांबे येथील घनदाट जंगलमध्ये पळून गेली.

मुलगी घरातून निघून गेली आणि तिचा शोध लागला नाही यामुळे वडिलांनी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आणि शोधमोहीम सुरू केली.

प्राथमिक चौकशीनंतर शोध लागला नाही यामुळे अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडगे यांनी रत्नागिरी येथे कार्यरत असणाऱ्या श्वान पथकाची मदत मागवली.

‘विराट’ या श्वानाला मुलीच्या घरातील एका वापरत्या टी-शर्टचा गंध देण्यात आला. यानंतर ‘विराट’ने पेढांबे येथील घनदाट जंगलात माघ काढत काही वेळातच पोलfसांना व तिच्या नातेवाईकांना मुली जवळ नेऊन उभे केले.

योग्य समुपदेशन, वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी मुलीला घरच्यांकडे सोपवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *