रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाला शांततेत सुरुवात झाली आणि मतदान पूर्ण देखील शांतेत झालं. मात्र एका घटनेने या शांतंतेला तडा गेला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत शांततेत मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये मात्र दुपारी अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अजीजा दाऊद हायस्कूल मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार योगेश हळदवणकर आणि शिंदे गटाचे उमेदवार निमेश नायर यांच्यात वाद चिघळत धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली. दुपारी सुमारे २.३० वाजता हळदवणेकर मतदान केंद्रावर आले असताना त्यांनी तेथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप केंद्राध्यक्षांकडे नोंदवला.
यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये तीव्र वाद झाला. हळदवणेकर यांच्या तक्रारीनुसार, वादाच्या भरात नायर यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताचा कोपरा मारून धक्काबुक्की केली.
याप्रकरणी हळदवणकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, नायर हे सकाळपासून त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारे देत असल्याचाही आरोप त्यांनी तक्रारीत नमूद केला आहे.
त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा करत त्यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शहरातील इतर सर्व प्रभागांत मतदान शांततेत पार पडले असून, या घटनेमुळे प्रभाग २ मध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















