रत्नागिरी : शहराला रविवार पासून सुरळीत पाणी पुरवठा

banner 468x60

एमआयडीसी प्रशासनाकडून नगर परिषदेस प्रतिदिन 5 दक्षलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील पंपिंग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून, रविवारपासून शहरातील जलवितरण पूर्ववत होणार आहे.

दरम्यान, शहरवासियांना कमीत कमी त्रास होईल, त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने सदैव तत्पर रहायला हवे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिली.

रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा योजनेसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्यधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.

पालकमंत्री . सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाने यावेळी सूचना केल्या. ते म्हणाले, नागरिकांना पाणी पुरवठा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

नगर परिषदेचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे समजताच एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांसाठी तात्काळ पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, हे प्रशासनाने पहावे.

त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कायम तत्पर असायला हवे. त्यासाठी प्रशासनदेखील अहोरात्र काम करत असून निश्चितपणे रविवारपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल. मुख्याधिकारी बाबर यांनी यावेळी सद्यस्थितीचा आढावा दिला.

रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ जॅकवेल या मुख्य जलस्त्रोतावरून संपूर्ण शहरात पाणी पुरवठा केला जातो. नगरपरिषदेमार्फत शहरात प्रतिदिन 18 दक्षलक्ष लीटर पिण्यायोग्य पाणी वितरीत केले जाते.

तथापि, गुरूवार 21 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजता नैसर्गिक आपत्तीमुळे शिळ जॅकवेल अचानक ढासळले. परिणामी, जॅकवेलमधील पंपींग यंत्रणा देखील नादुरूस्त होवून खाली गेल्याने शिळ जॅकवेल या जलस्त्रोतावरून शहरात होणारा पाणी पुरवठा बंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *