रत्नागिरी चंपक मैदान अत्याचार प्रकरण : अत्याचाराचा दोन दिवसात उलगडा होणार ? आतापर्यंत 5 युवक ताब्यात

banner 468x60

शहरानजीकच्या चंपक मैदान येथे १९ वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिस विभागाकडून सखोल तपास करण्यात येत आहे. या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून बुधवारी अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

banner 728x90

आतापर्यंत या प्रकरणात ५ जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.याप्रकरणी पीडित युवतीने दिलेला जबाब आणि वस्तुस्थितीमध्ये काही प्रमाणात विसंगती आढळून येत असल्याने पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

या पथकाद्वारे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल्सद्वारे तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. पीडित युवतीच्या वैद्यकीय चाचणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील तपासाला आणखी वेग मिळण्यास मदत होणार आहे.

लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने रत्नागिरीकर सुन्न झाले. संवेदना असलेले रत्नागिरीकर या हीन प्रकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले. या जनप्रक्षोभाला पोलिसांना तोंड द्यावे लागले. ‘संशयिताला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या,’ अशी मागणी करत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात धडकले.

या जनप्रक्षोभामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. संतप्त जमावाला आवरताना पोलिस दलाला नाकीनऊ आले. जमावाने अनेकदा ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला. तपास करण्यासाठी दोन-तीन दिवसतरी द्या, अशी विनंती जमावाला करण्याची वेळ पोलिसदलावर आली.पोलिसांनी त्यानुसार तपासाला गती दिली आहे.

तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस प्रत्येक मुद्द्याची उकल करत आहेत. काही महत्त्वाची माहिती हाती लागली असून त्या अनुषंगाने काल तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बुधवारी या प्रकरणामध्ये आणखी प्रगती झाली आहे. बुधवारी पोलिसांनी आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला; परंतु पीडितेचा जबाब आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीशी विसंगती आढळत असल्याने पोलिस दुसऱ्या बाजूनेही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *