रत्नागिरी : चालत्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळला, महावितरणच्या भोंगळ कामावर प्रशचिन्ह

banner 468x60

रत्नागिरी शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.


खांब कोसळताना विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे. मात्र अंगावर खांब पडून दुचाकी वरून जाणारे दांपत्य जखमी झाले आहे. या घटनेत दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

शहरांमध्ये अनेक ठिकाणी महावितरणचे अनेक खांब गंजलेल्या स्थितीत असून महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.

झालेला अपघात जर दुपारच्या वेळी घडला असता तर दुपारच्या वेळेस बाजारात असणाऱ्या गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान रत्नागिरी महावितरने जिल्ह्यातील सर्व पोलचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *