रत्नागिरी : भाट्ये पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

पावसाच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर चेकपोस्टजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावर कोसळला.

banner 728x90 banner 728x90


या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.


अपघातामुळे भाट्ये पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.


या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.रत्नागिरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत आणि अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *