रत्नागिरी : सावधान! जिल्ह्यात आणखी तापमान वाढणार

banner 468x60

रत्नागिरी शहर-जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून घामाने अंगाची लाही लाही होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान 30 ते 33 अंशापर्यंत जात आहे. येत्या आठवड्यात हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्यासह राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

banner 728x90 banner 728x90

मार्चच्या पहिल्याच आठवड्या पासून जिल्ह्यात उन्हाचे चटके, घामाने रत्नागिरीकर हैराण होत आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तापमान वाढत आहे. रत्नागिरी किनारपट्टीचा भाग असल्याने हवेतील आर्द्रता जास्त असणार आहे. त्यामुळे तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव अधिक त्रासदायक होणार आहे.अतिउष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होवून आरोग्यविषयक समस्या वाढणार आहेत. आताच उष्णतेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे आणि दूषित हवामानामुळे तापसरी, खोकला, पित्ताचे विकार वाढले आहे.


दरम्यान, पुढील आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता असून 16 मार्चच्या आसपास जिल्ह्यात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरींची शक्यता वर्तवली जता आहे. हवामानात बदल झाल्यास काहीअंशी तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्रात हीट स्ट्रोक रूम

सध्या वाढत्या तापमानामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला कायम सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हीट स्ट्रोक रूम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांनी हे करावे

-दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यावे

-लिंबू सरबत, ताक, लस्सी, नारळ पाणी, ओआरएसचे प्रमाण वाढवा

-हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा

  • बाहेर जाताना डोके टोपीने किंवा रूमालाने झाकावे
  • दिवसा खिडक्यांना पडदे लावा आणि रात्री तापमान कमी झाल्यावर

खिडक्या उघड्या ठेवा

नागरिकांनी हे टाळावे

-दुपारी 12 ते 4 यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे

  • उन्हाच्या वेळेत जड कामे, व्यायाम करू नका
  • मद्यपान, चहा, कॉफी, जास्त साखर असलेली पेये टाळा
  • फ्रीजऐवजी माठातील थंड पाणी प्यावे
  • ताप आल्यास मेडिकलमधून गोळी न घेता डॉक्टरांशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *