रत्नागिरी : बाळ मानेंना जे करायचं होतं ते केलं, भाजपला सोडचीट्टी देत बाळ माने यांचा ठाकरे गटात प्रवेश, एबी फॉर्मही घेतला

banner 468x60

सर्वच राजकीय पक्ष वारंवार बैठका, पत्रकार परिषद घेत असून राजकीय वर्तुळात अनेक नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

banner 728x90

याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून आज दुपारी मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.


बाळ माने यांनी भाजपा पक्ष सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज प्रवेश केला असून आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यावेळी बाळ माने यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी असलेला एबी फॉर्म देण्यात आला. महायुती तर्फे उदय सामंत यांना रत्नागिरीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री उदय सामंत आणि बाळ माने यांच्यात काटे की टक्कर अशी लढत होणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *