रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरिरसंबंध ठेवून फसवणुक करणाऱया संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी.
शादाब शौकत गोलंदाज (35, ऱा मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली होत़ी
शादाब याने याप्रकरणी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा.गुह्यातील माहितीनुसार, पिडीता 28 वर्षीय घटस्फोटीत महिला आह़े
एप्रिल 2024 मध्ये तिने एक एअर कंडिशनर खरेदी केला. यावेळी आरोपी तिच्या घरी ए.सी. बसवण्यासाठी आला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला
आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल़े दोघं विविध ठिकाणी एकत्र राहू लागले. त्या काळात आरोपीने वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
नंतर आरोपीचा स्वभाव बदलला आणि तो तिला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करू लागला. 2024 मध्ये गणपती उत्सवाच्या दरम्यान आरोपीने पिडीतेला मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादी तिच्या माहेरी गेली आणि तिने घडलेल्या प्रकारांची माहिती आई-वडिलांना दिली.काही दिवसांनी आरोपीने तिला भेटून पुन्हा लग्नाचे आश्वासन दिले व तिला परत घेऊन गेला.
मात्र, पुन्हा त्याने विवाह टाळला. जेव्हा तिने त्याला सांगितले की तो जर लग्न करत नसेल तर ती माहेरी जाईल, त्यावेळी आरोपीने धमकी दिली की, ‘जर तू तुझ्या आई-वडिलांच्या घरी गेलीस, तर मी रक्ताचे सडे पाडीन’ त्यानंतरही आरोपी तिला मारहाण करू लागला.
11 सप्टेंबर 2025 रोजी ती माहेरी परत गेली आणि आईवडिलांना आरोपीकडून होणाऱया त्रासाची माहिती दिली. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरोपी पुन्हा पिडीतेच्या घरी आला.
त्यामुळे तिला आपल्याला इजा होण्याची किंवा जीवितास धोका होण्याची भीती वाटली, म्हणून तिने शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी
त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69,115(2),352, 351(2) नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच संशयित आरोपी शादाब याला अटक केली होत़ी

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













