रत्नागिरी शहरात अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी राहत असलेल्या घरातील मुलगा आणि आईवर छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे.
त्यासंबंधीची तक्रार पीडित मुलीच्या आईने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
शहरातील अल्पवयीन मुलीने २२ मार्च रोजी राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अल्पवयीन मुलगी राहात असलेल्या घरामध्ये संशयित आरोपी हे मारझोड करत होते.
तसेच मानसिक छळ करत असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*