रत्नागिरी : आरे-वारे पॉईंटवरून कार थेट समुद्रात कोसळली

banner 468x60

सांगली येथून पावसाळी पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांची एक कार येथील प्रसिद्ध आरे-वारे पॉईंटवरून थेट समुद्रात १०० ते १५० फूट खाली कोसळली. बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सुदैवाने, गाडीतील पर्यटक फोटो काढण्यासाठी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील दोन पर्यटक आरे-वारे पॉईंटवर आल्यानंतर त्यांना निसर्गाची छायाचित्रे काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपली कार समुद्राच्या दिशेने उभी केली आणि दोघेही फोटो काढण्यासाठी खाली उतरले. मात्र, याच वेळी अचानक कार समुद्राच्या बाजूने झुकली आणि क्षणात खोल दरीत कोसळली.

गाडी समुद्रात कोसळताच तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस पाटील आदेश कदम यांना दिली. १०० ते १५० फूट खोल कोसळलेली गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत मागवण्यात आली. संबंधित कारचालकाने आपण हँडब्रेक लावला होता,

तरीही कार खाली कोसळल्याचे सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिकांच्या सहकार्याने क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *