रत्नागिरी : 3 लाख 61 हजारांच्या ब्राऊन शुगरसह चौघांना अटक

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर छापा टाकून पोलिसांनी ३ लाख ६१ हजार २०० रुपये किमतीचा ब्राऊन शुगर सदृश अंमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनाने शहरात गस्त घालत होते. यावेळी सिव्हील हॉस्पिटल ते निवखोल दरम्यान असलेल्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत ताहीर रफीक कोतवडेकर (रा. रुबी अपार्टमेंट, थिबा पॅलेस रोड), रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा), आकीब जिक्रीया वस्ता (रा. राजीवडा मच्छी मार्केट जवळ) आणि रफत करीम फणसोपकर (रा. जुने मच्छीमार्केट, राजीवडा) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन सदृश पदार्थ आणि इतर साहित्य आढळून आले.

पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेऊन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक

बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *