राजापूर : तरुणीशी फेसबुकवर मैत्री, लग्नानंतर मुंबईत रुम घेण्याचा बहाण्याने 7 लाखाची फसवणूक

banner 468x60

मुंबईतील तरुणाने एका तरुणीशी फेसबुकद्वारे मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत मुंबईत रुम घेण्याच्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल ७ लाख ३१ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

banner 728x90

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अंधेरी-मुंबई येथील विनीत किशोर काणेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनीतची २०१७ मध्ये या तरुणीशी फेसबुकवर मैत्री झाली. वर्षभर फेसबुकवर एकमेकांशी बोलल्यानंतर २०१८ मध्ये विनीत याने या तरुणीला लग्नासंदर्भात विचारणा केली.

त्यानंतर तरुणीने वडिलांना मुलाबाबत सांगितले. त्यावर वडीलही लग्नासाठी तयार झाल्याने त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी ते मुंबई येथे गेले. त्यावेळी दोघांची पसंती झाली होती. त्यानंतर १५ दिवसांनी विनीत याने या तरुणीला माझ्या आई-वडिलांनी लग्नाला होकार दिला आहे.

परंतु लग्नानंतर दोघांनी रुम घेवून वेगळे राहण्यास सांगितले आहे, असे तिला सांगितले. जून २०१९ मध्ये विनीत याने खोली घेण्यासाठी पैसे दे नाहीतर मी लग्न करणारं नाही, अशी धमकी संबंधित तरुणीला दिली. विनीत वारंवार पैशाची मागणी करू लागल्याने ही तरुणी व तिच्या वडिलांनी सप्टेंबर २०१९ पासून २०२२ पर्यंत विनीतच्या खात्यावर तब्बल ७ लाख ३१ हजार रुपये पाठवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, या तरुणीने विनीतला आपण लग्न कधी करुया व रुमच्या खरेदीचे काय झाले, याबाबत त्यास विचारणा करण्यास सुरुवात केली तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे विनीतने लग्नाचे खोटे आमिष दाखवून मुंबई येथे खोली घेण्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

संबधित तरुणी व तिचे वडील यांनी पैशाबाबत विचारणा केल्यानंतर विनीतने कर्ज मंजूर झाल्यावर पैसे देईन, अशी खोटी आश्वासने दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी विनीतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *