Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

राजापूर : तरुणीचा विनयभंग प्रकरण, संतोष मांडवकर विरोधात गुन्हा दाखल, आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय पुढारी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत पोलीस ठाण्यात थांबून

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कशेळी (आगवेकरवाडी) येथील संतोष बबन मांडवकर (वय 45) या व्यक्तीविरुद्ध एका तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वारंवार व्हॉट्सअॅपवरून अनुचित संदेश पाठवून तरुणीच्या विनयशीलतेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बी.एन.एस. कलम 78(2) व 79 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

घटना उघड झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना त्याला वाचविण्यासाठी गावातील दोन राजकीय पक्षाशी संबंधित पुढारी आरोपीला पाठीशी घालण्यासाठी आणि कारवाई होऊ नये यासाठी रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत पोलीस ठाण्यात थांबून होते. त्यांच्या या वागणुकीमुळे महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, राजकीय दबावामुळे पोलीस तपासावर परिणाम होईल का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.


परिसरातील महिला संघटना आता सरसावल्या असून, आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी यासाठी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. काही महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आरोपीला राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन गाव पुढाऱ्यांच्या कृतीबाबत त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ही बाब पोहोचवणार आहोत.”

या घटनेबाबत सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, “महिला संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट-ट्रॅकवर चालवण्यासाठीही प्रयत्न केले जातील.”महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सुरक्षिततेशी निगडित अशा गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.

आरोपीविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नवदुर्गांचा उत्सव सुरू असताना एका महिलेबाबत घडलेल्या या घटनेची दखल राजापूर लांजा विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घेतली आरोपी विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *