राजापूर : पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नियुक्ती

banner 468x60

राजापूरमध्ये गेले काही दिवस रिक्त असलेल्या आणि वारंवार अधिकारी बदलाच्या फेऱ्यात अडकलेल्या राजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा पद्भार स्विकारला आहे.

banner 728x90

राजापूरची शांततेची परंपरा अबाधित राखतानाच जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद अधिक भक्कम करण्याचा आपला प्रयत्न राहिल असे यादव यांनी सांगितले.

राजापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांची बदली झाल्यानंतर राजापूर पोलीस निरीक्षकपदाचा प्रभारी पद्भार नाटेचे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्याकडे देण्यात आला होता.

त्यानंतर भरत धुमाळ यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांचीही लोकसभा निवडणूक दरम्यान अन्यत्र बदली झाली. त्यानंतर फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती झाली मात्र त्यांचीही अवघ्या महिनाभरात बदली झाली व त्यांच्या जागी राजाराम चव्हाण यांची नियुक्ती झाली.

मात्र गेल्या महिनाभरात राजापुरातील घडामोडींमध्ये त्यांचीही रत्नागिरीत बदली करण्यात आली. त्यानंतर नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्याकडे राजापूरचा पद्भार देण्यात आला.

आता राजापूर पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता यादव यांच्या नियुक्तीने राजापुर पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी अधिकारी मिळाला आहे.

अमित यादव यांनी यापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरस, वैभववाडी, कणकवली काम केले आहे. एक वर्षापूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती झाली.

त्यांनी जिल्हयात संगमेश्वर व देवरुख या ठिकाणी काम केले आहे. एक तरूण तडफदार अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

राजापुरात गेल्या काही दिवसात दोन समाजामाध्ये तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांची जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर पोलीस निरीक्षकपदाचा जबादारी तरूण अधिकारी असलेल्या अमित यादव यांच्यावर सोपवली आहे.

राजापूर पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडताना राजापुरातील सामाजिक सलोखा अबाधित राखुन शांतता प्रस्थापित करताना पोलीस आणि जनतेमध्ये विश्वासाचे नातं निर्माण करण्याचे आव्हान यादव यांना पेलावे लागणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *