मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील ओणीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

या घटनेची माहिती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी राजापूर वनविभागाला दिली. राजापूर वनविभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ३.४० वाजता लांजा-राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मौजे ओणी परिसरात एक बिबट मृत अवस्थेत पडलेला आढळला.
माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचा पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट (नर, वय अंदाजे ३ ते ४ वर्षे) महामार्गाच्या उजव्या बाजूला निपचित अवस्थेत दिसून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पशुधन विकास अधिकारी वैभव चोपडे यांनी घटनास्थळीच बिबट्याचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी आवश्यक कागदपत्रे तयार करून पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) सौ. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक सौ. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपाल जयराम बावधने, वनरक्षक विक्रम कुंभार व नीलेश म्हादये यांनी सहभाग घेतला.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















