राजापूर : आई नारळ जमवायला गेली, समोरच मुलाचा पडलेला मृतदेह

banner 468x60

राजापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापूरमध्ये एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली, हृदयद्रावक बाब म्हणजे त्याच्या आईलाच त्याचा मृतदेह सापडून आला.

banner 728x90

या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 35 वर्षीय तरुणाने आपला जीव दिला. नारळ जमवत असताना आईला आपल्या मुलाचा मृतदेह दिसून आला. हे पाहताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. लेकाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला.

हा सगळा धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात घडला आहे. राजापूर तालुक्यातील हुसे गावातील ही घटना असून शैलेश वामन धुरी (वय 33 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 22 ऑगस्ट रोजी 2025 रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान आपल्या आयुष्याची अखेर केलेल्या शैलेश धुरी यांची आई त्यांच्या मोठ्या जावेच्या जागेच्या इकडे यापूर्वी राहत होत्या.

त्याठिकाणी नारळाचे झाडे असल्याने त्या नारळ शोधण्यासाठी गेलेल्या होत्या. झाडाचे नारळ पडले आहेत का हे शोधत असताना त्याठिकाणी असलेल्या आंबा कलमाच्या झाडाखाली त्यांना चौकड शर्ट दिसलं, त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठा धक्का बसला. आंब्याच्या झाडाच्या फांदीला नॉयलॉन रस्सी लटकत होती. ती मध्येच तुटली होती. तर खाली पालथ्या स्थितीत एका फुगलेला मृतदेह होता.

त्यावर माशा बसलेल्या दिसत होत्या . कोण आहे हे पाहयला गेल्या, तेव्हा त्यांना आपल्याच मुलाचा चेहरा दिसला. हे पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो मृतदेह त्यांचा मोठा मुलगा शैलेश वामन धुरी याचा होता. त्यांनी आरडाओरड केला, त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थ जमले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ या सगळ्या घटनेची माहिती नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली.

नाटे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या सगळ्या घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद करण्यात आली आहे, अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत. या तरुणाने जीव का दिला यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शैलेश हा कोणताही काम धंदा करत नव्हता, त्याने यापूर्वीही अशा प्रकारचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *