आले राजापूर आगाराच्या मना, तेथे कुणाचे
चालेना…’ अशी स्थिती राजापूर आगाराच्या कारभाराची बनली आहे. एखाद्या मार्गावर चांगले भारमान देणाऱ्या गाड्या अचानक रद्द करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
राजापूर आगाराची सकाळी सौंदळ चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ, यामार्गे राजापूरला येणारी आंबा गाडी चांगले भारमान मिळूनही राजापूर आगाराने अचानक बंद केली. गेली अनेक वर्षे सकाळी आंबा, पाचलकडून ही बस चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ मार्गे राजापूरला येत होती.
शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांसाठी या बसचा चांगला फायदा होत होता. मात्र, राजापूर आगाराने कोणतीच पूर्व कल्पना न अचानक ही बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्याचबरोबर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुटणारी राजापूर-येरडव ही गाडी अचानक रद्द केली. त्याबाबत आगाराने प्रवाशांना कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. गाडी सुटण्याची वेळ निघून गेल्यावर काही प्रवाशांनी आगारात संपर्क साधल्यावर त्यांना गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सध्याचा हंगाम लक्षात घेता लांजा, गगनबावडा आगाराच्या गाड्या तालुक्याच्या पूर्व भागातून मुंबई, बोरिवलीकडे सोडल्या जातात. पण, येरडव-मुंबईसह अन्य गाड्यांची मागणी करूनही राजापूर आगार त्याकडे दुर्लक्ष करते. हे असेच सुरु राहिले तर आंदोलन करावे लागेल.-आण्णा पाथरे, पाचल

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*