अहिल्यानगर येथील साई सिल्वर लोन, शिर्डी येथे 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 8 वी क्यूरोगी व 5 वी पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. राज्यभरातील सुमारे 450 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत तायक्वांदो अकॅडमी राजापूर, नॅशनल इंग्लिश स्कूल, तसेच ए. ई. काळसेकर कॉलेज, रानतळे येथील कु. शुभ्रा विवेक गुरव हिने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत 29 किलो खालील गटात उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्य पदक पटकावले. त्याचप्रमाणे राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी आयुष संतोष बावकर याने 61 किलो खालील वजनी गटात प्रभावी खेळ करत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत श्रुतिका विजय मांडवकर हिची पंच म्हणून निवड झाली होती, ही देखील राजापूरसाठी अभिमानाची बाब ठरली.
दोन्ही खेळाडू राजापूरमधील धर्मशाळा मारुती मंदिर येथे कार्यरत मुख्य प्रशिक्षण केंद्रात तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असून त्यांना मुख्य प्रशिक्षक श्री. मुकेश शांताराम नाचरे, तसेच सौ. मधुरा नाचरे, श्रुतिका मांडवकर, अंश गुंड्ये आणि गौरव धालवलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील,
उपाध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, तसेच धुलीछंद मेश्राम, अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच जिल्हा पदाधिकारी शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, लक्ष्मण कररा आणि शशांक घडशी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजित जनार्दन तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दीपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, मानसी दिवटे, दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, निलेश रहाटे यांनीही सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समस्त पालकवर्गांनीही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















