राजापूरचं जोडपं माथेरानला फिरायला, हॉटेलमधून अचानक बेपत्ता, दरीत मृतदेह सापडले

banner 468x60

रत्नागिरीच्या राजापूरमधून नवी मुंबईतील माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत.

राजापूरचं रहिवासी असलेलं दाम्पत्य ११ जुलैला माथेरानला फिरण्यासाठी आलं होतं. जोडप्याच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. संध्याकाळच्या सुमारास जोडपं फिरण्यासाठी बाहेर पडलं.

त्यांचा मुक्काम हॉटेल ब्राईट लँडमध्ये होता. फिरण्यासाठी गेलेलं जोडपं परतलं नसल्याचं दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिली.

व्यवस्थापकांनी पोलिसांना याबद्दल कळवलं. पोलिसांनी दाम्पत्याचे फोटो व्हॉट्स ऍपच्या अनेक ग्रुप्सवर पाठवले. दाम्पत्याला काही माहिती समजल्यास, ते कुठे दिसल्यास कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता जोडपं इको पॉईंटला जाताना दिसलं. त्यांचं शेवटचं लोकेशन दरीजवळ असल्याचं तपासातून स्पष्ट झालं.

यानंतर सह्याद्री रेक्स्यू टीमची मदत घेण्यात आली. त्यांनी दरीत शोध सुरु केला. १४ जुलैला पार्थ यांचे लहान भाऊ रुद्राक्ष भोगटे माथेरानला पोहोचले. त्यांनी माथेरान पोलीस ठाणं गाठलं आणि भाऊ, वहिनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. रेस्क्यू टीमला सोमवारी लुईसा पॉईंटजवळ जोडप्याचे मृतदेह सापडले.

घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा दोघांचे मृतदेह वर काढण्यात आलेले नव्हते. ‘प्राथमिक तपासातून समोर आलेल्या तपशीलानुसार जोडप्याला शेअर बाजारात नुकसान झालं होतं. त्यातून त्यांनी हे पाऊल उचललं असण्याची शक्यता आहे,’ असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलं.

या प्रकरणात अद्याप तरी शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे जोडप्यानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष आम्ही काढलेला नाही. आमचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. दिवसभरात याबद्दल स्पष्टता येईल, असं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंनी सांगितलं.

दाम्पत्यानं आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काहीतरी घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *