राजापूर : विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू

banner 468x60

पेंडखळे भवानी मंदिर परिसरात (ता. राजापूर) मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसून वायरमन अनिकेत परवडी (वय २७, रा. तिथवली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

banner 728x90

दुरुस्तीच्या कामासाठी ऑपरेटरकडून वीज वाहिनी बंद करून अनिकेत खांबावर चढला होता. मात्र अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुण वायरमनच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *