राजापूर : व्यावसायिकाची फसवणूक, विश्वासात घेऊन टाटा पिकअप ट्रक गायब

banner 468x60

राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील एका व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून, त्यांचा १० लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा पिकअप ट्रक परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मिरज (जि. सांगली) येथील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90


फिर्यादी भुपाळ भिकाजी तारकर (वय ४२, रा. बाकाळे, ता. राजापूर) यांच्या मालकीचा टाटा पिकअप इंट्रा V30 (क्रमांक MH 08 AP 7912) हा ट्रक आरोपी परमेश्वर केशव जाधव (रा. गणेश तलाव, मिरज, जि. सांगली) याने विश्वासाने चालवण्यासाठी घेतला होता.

मात्र, फिर्यादी यांनी आपला ट्रक परत मागितला असता, आरोपीने तो देण्यास टाळाटाळ केली.

आरोपी परमेश्वर जाधव याने ट्रक परत न करता, फिर्यादीचा विश्वासघात करून तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला आहे. या ट्रकची एकूण किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ६ जानेवारी पासून हा प्रकार सुरू होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.


याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता आरोपी परमेश्वर जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(१) आणि (२) (विश्वासघात व अपहार) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *