राजापूर : दोन मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली.
याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या आक्षेपाचे निवेदन दिले आहे.राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला.
त्यातील निकालाबाबत आपल्याला संशय वाटत असल्याचे राजन साळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २६ एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतरही ७ दिवसाच्या आत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करु शकतात.
त्या आधारे निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २ – चाफवली व केंद्र क्रमांक २०० – तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर व व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निर्माण झालेला संशय दूर करावा, असे राजन साळवी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*