रायगड : पनवेलमध्ये स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती, बसस्टॉपवर सोडतो सांगत अज्ञातस्थळी नेत विद्यार्थिनीवर अत्याचार

banner 468x60

स्वारगेट बस डेपोतील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पनवेलमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. कॉलेजला चाललेल्या विद्यार्थीनीला बसस्टॉपवर सोडतो सांगत गाडीत बसवले. मग अज्ञातस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला.

banner 728x90

दहा दिवसांनी मुलीने पालकांना याबाबत सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. यानंतर पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दहा दिवसांपूर्वी पीडित विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना आरोपी इको चालकाने मुलीला बसस्टॉपवर सोडतो असे सांगितले. मुलगी गाडीत बसल्यानंतर आरोपीने गाडी अज्ञातस्थळी नेली. यानंतर मुलीवर अत्याचार केला.

या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने पालकांना सांगितले नाही. दहा दिवसांनंतर अखेर मुलीने पालकांना सर्व घडला प्रकार सांगितला. पालकांनी तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अमोल पदरथ असे आरोपीचे नाव असून त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *