चिपळूण : सावर्डे फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका  हलिमा मालगुंडकर साल्हे यांच्या औषध संशोधनास पेटंट

banner 468x60

सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका हलिमा मालगुंडकर -साल्हे यांनी न्यानोसस्पेन्शन ऑफल्यानसोप्राझोल हे औषध तयार केले आहे.

सावर्डे फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका हलिमा मालगुंडकर – साल्हे यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्रकाशित करण्यातआले आहे.

पित्ताचा त्रास आजकाल सर्वसामान्य झालेला असून त्याचा आरोग्यावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. ल्यांसोप्रझोल हे पित्तविरोधी औषध म्हणून काम करते पण रासायनिक गुणधर्मामुळे ल्यांसोप्राझोलच्या वापरावर मर्यादा होत्या.

नवीन केलेल्या संशोधना मुळे त्याचे गुणधर्म सुधारून त्याची उपयुक्तता, गुणवत्ता सुधारून ते अधिक कालावधी साठी वापरता येणारआहे. सदर औषधाची परिणामकारकता अधिक आहे. सदर संशोधनात प्रा. ललिता नेमाडे, प्रा. मदन पोमाजे यांनी मार्गदर्शन केले असून,


प्रा. प्रियांका हंकारे आणि प्रा. ऋषीकेश हिंगमिरे व संपूर्ण कॉलेज परिवाराकडून सहकार्य लाभले. या संशोधना बाबत त्यांचे सह्याद्री शिक्षण संस्था, बिल्ड नेशन टुगेदर संस्था, ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे कडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *