राजापूर : शाळेत गरबा खेळताना विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, नेमकं घडलं काय?

banner 468x60

कोकणात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं

मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात हा दु:खद प्रसंग सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारा आहे.

ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने पाचल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजापूर तालुक्यातील आजीवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने वय १६ या विद्यार्थिनीचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे.

सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला आहे. नवरात्रउत्सवात विविध ठिकाणी शाळेत देवी बसवली जाते देवीचे पूजन केली जाते

व नवरात्रोत्सवाचा आनंदात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच सहभागी होतात या पारंपरिक सणाचा आनंद घेताना ही परंपरा कळावी हा यामागे उद्देश असतो.

10 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार वाजवण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुपारच्या सुमारास दांडिया कार्यक्रम सुरू असताना या मुलीला चक्कर आली. उपस्थित असलेल्या शिक्षकांनी तत्काळ धावपळ करून तिला डॉक्टरांकडे दाखल केले.

चक्कर आलेली ती मुलगी खाली बसली शिक्षकांनी क्षणाचाही वेळ न लावता रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले.

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मुलीचा तात्काळ इसीजी काढण्यात आला मात्र त्या मुलीचा मृत्यू झाला होता ही वाईट बातमी कळताच माने कुटुंबियांबरोबरच सरस्वती विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथील शिक्षक व विद्यार्थी ही हळहळले.

आपल्याबरोबर रोज शाळेत येणारी,अभ्यास करणारी आनंदाने दांडियात सहभागी होणारी काही वेळापूर्वी आपल्या सोबतच आनंदाने दांडिया खेळत असलेली मैत्रीण सोडून गेल्याचे मोठे दुःख झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्याही अश्रूचा बांध फुटला.

या धक्कादायक प्रकारामुळे माझे कुटुंबीयांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवी पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी होती.

तिचे वडील सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. तिच्या पश्चात आई वडील, काका, काकू दोन लहान भावंड असा मोठा परिवार आहे. राजापूर पाचल पोलीस ठाण्यात २६/२०२४ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *