पालगड : विद्यालयात साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी

banner 468x60

बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पूज्य साने गुरुजी यांचे जन्मगाव असलेल्या पालगड या ऐतिहासिक व पवित्र भूमीत साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी संचलित साने गुरुजी विद्यामंदिर, पालगड येथे साने गुरुजींची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम साने गुरुजी कलामंदिर, पालगड येथे पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून. लक्ष्मीकांत पांडुरंग पाटील (पर्यवेक्षक, एन. के. वराडकर ज्युनिअर कॉलेज, दापोली) उपस्थित होते. तसेच साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी पालगडचे संचालक. संदीप खोचरे,. लीनाताई खोचरे, रमा बेलोसे,. नेहा जाधव,. रत्नाकर गुरव, . विश्वनाथ तांबडे, पोलीस पाटील रुपेश बेलोसे, कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्सचे अध्यक्ष अनंत बामणे, विकास वेदक, सिद्धेश गणवे, सूर्यकांत पवार, दीपक वारे, आदित्य मोरे, शाळेचे मुख्याध्यापक. प्रसाद पावशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

banner 728x90

मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी स्मृतिभवन येथे साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हायस्कूल परिसरातील साने गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. इशस्तवन व स्वागत पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या वतीने. संदीप खोचरे यांनी प्रमुख पाहुणे . लक्ष्मीकांत पाटील यांचा यथोचित सन्मान केला. मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यानंतर साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी, पालगड यांच्या वतीने देण्यात येणारा सेवा गौरव पुरस्कार २०२५ श्री. विलास बंधू गोसावी (एम.एस.ई.बी., पालगड – वरिष्ठ तंत्रज्ञ/वायरमन) यांना प्रदान करण्यात आला. पालगड पंचक्रोशीतील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव दरवर्षी या पुरस्काराने करण्यात येतो. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय. विश्वनाथ तांबडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एम.एस.ई.बी. विभागाचे शाखा अभियंता संजय बेडदुर्गे,. मोरे व. सुमित पाटील उपस्थित होते.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. विशेषतः राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या कुमारी मनस्वी संदीप जामकर (इयत्ता ८ वी) हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या संचालिका. लीनाताई खोचरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे. लक्ष्मीकांत पाटील यांनी साने गुरुजींचे विचार व संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्व कथांच्या माध्यमातून प्रभावीपणे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष. विश्वनाथ तांबडे यांनी साने गुरुजींच्या कार्याची ओळख करून देताना विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा आदर करून त्यांच्या आशीर्वादाने पुढे जाण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सांगता. मंजिरी शितूत यांनी सादर केलेल्या “बल सागर भारत होवो” या भैरवीने करण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक दत्तप्रसाद गुरव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *