चिपळूण : विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील तनाळी रामवाडी येथे भक्ष्याच्या मागावर असताना एका बिबट्या मादीचा तोल जाऊन ती सुमारे 40 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून जवळपास तासभराच्या प्रयत्नांनंतर तिची सुटका केली.

banner 728x90

विहिरीत सुमारे 10 फूट पाणी असून बिबट्या सतत झुंज देत असल्याचे पथकाला आढळले. दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत खाली सोडून अखेर तिला सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं. प्राथमिक तपासणीत ती 1.5 ते 2 वर्षांची मादी असून कोणताही गंभीर अपघात झालेला नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर वनविभागाने तिला जंगलात परत सोडले.या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.वनविभागाने नागरिकांना आवाहन केले की, कोणताही वन्यप्राणी संकटात दिसल्यास त्वरित 1926 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *