चिपळूण : अपरांत हॉस्पिटल द्वारे निरोगी किडनी-निरोगी जीवन या उपक्रमाचे आयोजन

banner 468x60

चिपळूणमध्ये शनिवारी दि.९ ऑगस्ट रोजी अपरांत हॉस्पिटल येथे निरोगी किडनी निरोगी जीवन या लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी केली जाणारी क्रिएटिनिन ही चाचणी मोफत केली जाणार आहे.

banner 728x90

शिबिरार्थींच्या बी पी, शुगर, ईसीजी यासारख्या तपासण्यांसोबतच अपरांत हॉस्पिटलचे एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर यांचे द्वारे मोफत सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.


‌किडनी रक्तातील घाण अतिरिक्त पाणी गाळून मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे मुख्य कार्य करते. मुतखडा, प्रोस्टेट, लघवीला जळजळ, रक्त मिश्रित दुर्गंधीयुक्त लघवी, लघवीवर नियंत्रण न रहाणे, यासारख्या विकारामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.


‌‌. उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार, मुतखडा, प्रोस्टेट, नपुसकत्व, यासारख्या आजारावर वैयक्तिक समुपदेशन, युरो सर्जन (मूत्र विकार तज्ञ), नेफरोलॉजिस्ट (किडनी विकार तज्ञ), यांचे गरजेनुसार सल्ला व मार्गदर्शन. यासारख्या अनेक सुविधांमुळे हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 7998898989 व 8380860136 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *