टेलिग्राम अॅपवर वेगळवेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखवत महिलेची 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती NE घटना 18 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 ते 19 जुलै रोजी सायंकाळी 6.47 वा. कालावधीत फणसोप सडा येथे घडली आहे. पियूष यादव, मीनाक्षी गानोस्कर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी तिच्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम अॅपवर लिंक पाठवून तिच्याशी ओळख निर्माण NE त्या महिलेची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक वेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखवले.
त्या आमिषाला बळी पडत फिर्यादी महिलेने संशयितांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 1 लाख 3 हजार रुपये भरले.
परंतु, त्यातील फक्त 3 हजार रुपये परत करुन संशयितांनी फिर्यादीची 1 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 कलम 318(4), सह माहिती तंत्रज्ञान 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*