नगरपंचायत निवडणुका ! प्रचारासाठी एक दिवसाची मुदतवाढ, मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराला परवानगी

banner 468x60

नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याआधी ३० नोव्हेंबरपर्यंतच प्रचाराची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढू लागल्याने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

banner 728x90 banner 728x90

उमेदवारांना तब्बल १ दिवसाचा वेळ मिळणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवारांना प्रचारात आणखी वेळ मिळणार आहे. दरम्यान, २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून राज्यातील अनेक नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाने शांतता कालावधीचा विचार करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

मतदाना दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलांसह सर्व विभाग सतर्क राहणार आहेत. महत्वाकांक्षी उमेदवारांसाठी या निर्णयामुळे प्रचाराची आणखी एक संधी उपलब्ध झाली असून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांकडून आखाडा सजवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *