गुहागर : ‘लाडके भाऊ’साठी सर्वाधिक प्रशिक्षणार्थी – माजी आमदार विनय नातू

banner 468x60

मुख्यमंत्री युवा कार्य योजनेंतर्गत राज्यात लाडके योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत कोकण विभागातून ७ हजार ६९१ उमेदवार प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून,

सर्वाधिक चांगला प्रतिसाद ठाणे जिल्ह्यापाठोपाठ रत्नागिरीतील उमेदवारांनी दिला आहे. या सर्व उमेदवारांचे मी कौतुक करतो.

भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी या योजनेच्या माध्यमातून तरुणांना मिळतील, अशी अपेक्षा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा नुकताच घेण्यात आला. विविध आस्थापनांमध्ये युवकांना प्रशिक्षण भाऊ ही कामासाठी प्रोत्साहित करून ६ महिन्यांत किमान प्रशिक्षण द्यावे.

त्याआधारे पुढील काळात या युवकांना चांगली रोजगार संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. कोकण विभागामध्ये ७ हजार ६९१ उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू झाले असून, १३ हजार ८८७ उमेदवारांची निवड झाली

आहे. राज्याच्या तुलनेत कोकण विभागात कामासाठी हजर होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. ठाणे जिल्ह्याच्या पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनीही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन महत्त्वाकांक्षी योजना सर्वच घटकांसाठी जीवनदायी ठरल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. विनय नातू यांनी केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *