मंडणगड : तलावारीने वार करुन 20 वर्षिय युवकाला मारहाण, तंजीम तौफिक मुकादम विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

मंडणगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणत्याही कारणाविना म्हाप्रळ येथे तलवारीने वार केल्याने २० वर्षिय युवकाला जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद 7 मार्च 2025 रोजी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (वय 20 वर्ष) राहणार म्हाप्रळ हे घटनेतील पिडीत युवकांचे नाव आहे. या घटनेसंदर्भात पिडीत युवकाने नोंदविलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार 6 मार्च 2025 रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ येथील परेरा फार्म हाऊसला

जाणारे रस्त्यावर घटनेतील आरोपीत तंजीम तौफिक मुकादम राहणार म्हाप्रळ याने नमुद वेळ व घटनास्थळी दाखल होत कोणतेही कारण नसताना फिर्यादीचे डोक्यावर दोन्ही हातांच्या पंजावर तलवारीने वार करुन तसेच हाताने मारहाण करुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

फिर्यादीचे दुखापतीस कारणीभूत असून तक्रारीनुसार आरोपीच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात बी. एन. एस. 109 (1) 118(2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपीस मंडणगड पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *