मंडणगड :बाणकोट- वेळास रस्त्याची धूप

banner 468x60

मंडणगड :- कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास गावाला जाणारी वाट दिवसेंदिवस खडतर होत चालली आहे . समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने

बाणकोट- वेळास रस्त्याची धूप होऊ लागली आहे . कालांतराने हा रस्ताच नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे .

या बाबीकडे प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांबरोबरच वेळास गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे .

वेळास गावाला जोडणारा बाणकोट ते वेळास या समुद्रालगत असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे . रस्त्याला असलेली दगडांची संरक्षक भिंत नष्ट झाल्याने समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे . स्थानिक ग्रामस्थांना याची सवय झाली असली तरी पर्यटकांना मात्र जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे . समुद्राचे उसळलेले पाणी थेट रस्त्यावर येत आहे . या पाण्याबरोबर समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन पडत आहे .

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *