मंडणगड : प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी ‘प्रवासी राजा’ दिनाचे आयोजन

banner 468x60

मंडणगड एसटी आगाराचं स्तुत्य उपक्रम मंडणगड एसटी आगारासंदर्भातील प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी मंडणगड येथे दि. 7 मार्च २०२५ रोजी प्रवासी राजा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंडणगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात छोटे आगार असून वरिष्ठ पातळीवरून या आगाराला नेहमीच सापत्नापणाची वागणूक दिली जात आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून बाद आणि खराब झालेल्या बसेस या मंडणगड आगाराच्या माथी मारल्या जातात. गेल्या काही वर्षात एसटीच्या ताफ्यामध्ये शिवशाही, शयनयान आसनी या प्रकारच्या बसेस दाखल झाल्या तसेच नव्या स्वरूपात लालपरी या प्रकारातील बसेस दाखल होत आहेत.

मात्र मंडणगड आगाराला एकही बस दिली नाही. त्याचप्रमाणे अनेक मार्गावर बसेस सुस्थितीत सोडल्या जात नाहीत. तर काही बसेस या मंडणगड सारख्या डोंगराळ व दुर्गम भागात प्रवासाच्या लायक नाहीत.

त्याही बसेस मंडणगड आगाराला वापरायला दिल्या जात आहेत. तसेच मंडणगड आगारातून नवीन मार्ग सुरू करण्यास परवानगी दिली जात नाही. याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करूनही आगाराच्या कारभारात सुधारणा होत नाही.

त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर दि. 7 मार्च रोजी प्रवासी राजा दिन होत असून

या दिवशी मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी मंडणगड तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जाब विचारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *