मंडणगड : कौटुंबिक वादातून लाकडी दांड्याने मारहाण, बाप-लेकासह पत्नीही जखमी

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील पंदेरी वरचा मोहल्ला
येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने वडील, मुलगा आणि पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दि. ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी नदिम अब्दुल शकुर तहविलदार या आरोपीविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kokan News Update Whatsap group Join : https://chat.whatsapp.com/DJBXrCrkrKv4tQLrS689uf?mode=ac_c

banner 728x90


याबाबत फिर्यादी महम्मद हनीफअलीमिया तहविलदार (वय ७३, रा. पंदेरी मस्जिद मोहल्ला) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीच्या घराचे काम सुरू असताना, आरोपी नदिम तहविलदार हा खाली येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला.

त्याने दमदाटी करत हातातील लाकडी दांड्याने महम्मद हनीफअलीमिया तहविलदार आणि त्यांचा मुलगा मुस्तफा महम्मद तहविलदार यांना मारहाण केली. एवढेच नाही तर, त्याने फिर्यादीची पत्नी नुरजहा हिलाही लाथेने मारहाण केली. या मारहाणीत महम्मद हनीफअलीमिया तहविलदार आणि त्यांचा मुलगा मुस्तफा तहविलदार जखमी झाले आहेत. दि. ७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:३४ वाजता या घटनेची नोंद गु.र.नं. ३०/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे करण्यात आली आहे.

मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कौटुंबिक कलहातून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *