मंडणगड येथील लाटवण येथील ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह भारजा नदीपात्रात तिडे येथे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खुदन नेमन मेहता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना भारजा नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाची ओळख खुदन नेमन मेहता (वय ७३, रा. लाटवण) अशी पटली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, ते नदीत कसे पडले याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे लाटवण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*