रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश गोपीनाथ खडपे (वय ५७, रा. अंजनवेल , ता. गुहागर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कराड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
whatsap join Group
https://chat.whatsapp.com/DPwxHc9SqS13RpDBub7tE9
मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकाश खडपे हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता अंजनवेल येथे रस्त्यावरून चालत असताना गव्याने अचानक धडक दिली. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुमारे १५ दिवस उपचार सुरू असतानाच, दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण अंजनवेल गावात व गुहागर परिसरात शोककळा पसरली आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे वस्तीच्या परिसरात होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गव्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















