दापोली : रामराजे महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

banner 468x60

डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे महाविद्यालयात आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे व प्रा. माधव गव्हाणकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विचार मांडले.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जीवन गुहागरकर यांनी केले तर आभार प्रा. स्मिता बैकर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *