लांजा : पंचायत समिती सभापतीपदी मानसी आंबेकर, उपसभापतीपदी आदेश आंबोळकर, सोमवारी पदग्रहण

banner 468x60

लांजा पंचायत समितीच्या सभापतीपदी मानसी आंबेकर तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांची निवड निश्चित झाली असून सोमवारी (दि. ९ मार्च) अधिकृत घोषणा होऊन दोघेही आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

banner 728x90 banner 728x90

नुकत्याच पार पडलेल्या लांजा तालुक्यातील आठ पंचायत समिती गण व चार जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वच्या सर्व १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे पंचायत समितीत शिवसेनेचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे.

यामुळे सभापतीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे लांजा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, सभापतीपदी मानसी आंबेकर यांची निवड होणार असल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. अखेर त्या वृत्तावर शिक्कामोर्तब होत मानसी आंबेकर यांची सभापतीपदी तर आदेश आंबोळकर यांची उपसभापतीपदी निवड निश्चित झाली आहे.

सोमवारी सकाळी अधिकृत घोषणा होऊन दुपारी तीन वाजता पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असून सुरुवातीच्या पहिल्या सव्वा वर्षासाठी मानसी आंबेकर आणि आदेश आंबोळकर यांना संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *