लांजा : विवाहित महिला बेपत्ता

banner 468x60

लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथून २७ वर्षीय विवाहिता किरण संजय चव्हाण दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ती बेपत्ता झाली आहे.

banner 728x90

या महिलेची उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस मध्यम मोकळे सोडलेले, अंगात चॉकलेटी टॉप, पांढरा सलवार, गळ्यात सोन्याचे छोटे व मोठे मंगळसूत्र, सोन्याचा हार, कानात सोन्याची कुडी,

नाकात सोन्याची नथनी, पायात चांदीचे पैजण, जोडवी, सोबत चॉकलेटी रंगाची सॅक व त्यामध्ये तिच्या वापरायचे कपडे व ४४ हजार रुपये आहेत.

सोबत सृष्टी नावाची सहा वर्षाची मुलगी व चार वर्षाचा स्वराज नावाचा मुलगा असून, तिच्याजवळ पांढऱ्या रंगाची दुचाकी अॅक्टीवा गाडी क्र. एमएच ०८ एआर ०८८७आहे. ही महिला कोठे आढळल्यास लांजा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *