शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या माजळ येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५ वर्ष) या तरुणाचा मृतदेह शनिवारी २० सप्टेंबर रोजी कोंड्ये-झापडे धरणात आढळून आला.
तालुक्यातील माजळ गावातील माजळकरवाडी येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५) हा लांजा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तो आपल्या माजळ या गावी पत्नी, आई आणि दीड वर्षांचा मुलगा यांच्या सोबत राहत होता.
विशाल माजळकर हा शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारपासूनच बेपत्ता होता. तो घरी न परतल्याने आणि मोबाईलवर देखील कॉन्टॅक्ट होत नसल्याने गावकरी त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता विशाल याची मोटरसायकल कोंडये-झापडे धरणाच्या किनाऱ्यावर आढळून आली होती. या गाडीच्या डिकीत त्याचा मोबाईल आणि पैसे त्यांनी ठेवले होते. त्याच्यात चप्पल देखील होती. त्यामुळे गावकरी, नातेवाईक यांनी धरण परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.
त्यानंतर शनिवारी २० सप्टेंबर रोजी त्यानंतर वाडकऱ्यांनी पुन्हा धरण परिसरात त्याचा शोध घेतला असता बेपत्ता विशाल माजळकर याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















