लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणार्या लांजा-कोर्ले या मुख्य मार्गावर सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने सुरूचे मोठे झाड कोसळले. रस्त्याशेजारी असलेल्या बांधकाम शेडवर झाड कोसळल्याने स्थानिक रहिवाशाचे मोठे नुकसान झाले.
झाड पडल्याने लांजा-कोर्ले मार्गावर तासभर वाहतूक खोळंबली होती. यशवंत पाडावे असे या घटनेत नुकसान झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी
घटनास्थळी पाहणी करून पडलेले झाड क्रेनच्या सहाय्याने बाजुला करुन मार्ग मोकळा करण्यात आल्यानंतर लांजा-कोर्ले मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. लांजा-कोर्ले मार्गावरून वाहनांची दिवस-रात्र कायम वर्दळ असते. मात्र, सोमवारी सकाळी वाहनांची वर्दळ नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*